प्रतिष्ठा न्यूज

डॉ.ग.गो.जाधव महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियान व्यसनमुक्त युवकच देशाला पुढे नेऊ शकतो : डॉ सुनिता बहिणजी

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : डॉ.ग.गो.जाधव महाविद्यालय व प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ऑक्टोबर २०२३ रोजी नशा मुक्त भारत अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी ब्रम्हकुमारी  प्रतिभा बहनजी यांनी ‍ विद्यार्थ्यांना आपले जीवन यशस्वी बनविण्याकरीता जीवन शैली मध्ये बदल करण्याचे आवश्यक असल्याचे नमुद केले. तर प्रमुख वक्त्या डॉ. सुनिता बहनजी यांनी व्यसन आणि व्यसनाचे होणारे परिणाम उदाहरणासहित समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील होत्या. या कार्यक्रर्माकरीता संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतिश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. एस. एस.पानारी यांनी करून दिले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. ए.एस.जमादार यांनी मानले. याप्रसंगी प्रा. घाटगे एस. एस. प्रा. सरनोबत आर. आर प्रा. येडगे आर. आर.प्रा. एस.एस.देसाई व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.