नांदेड येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुरेश कदम यांचे निधन
प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नांदेडचे माजी अध्यक्ष व कदम हॉस्पिटल भाग्यनगरचे संचालक प्रसिद्ध अस्थिरोग व बधिरीकरण तज्ञ डॉ. सुरेश गोपाळराव कदम यांचे पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात काल दि.17 जानेवारी 2023 रोज मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असुन त्यांचे पार्थिवावर आज दि.18 जानेवारी 2023 रोज बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै.सुरेश कदम हे मराठवाडा शिक्षण संस्थेचे संचालक गोपाळराव कदम यांचे चिरंजीव होत.
त्यांचे पश्चात आई, वडील, पत्नी डॉ. वर्षा मनुरकर 1मुलगा,1मुलगी,1भाऊ, असा परिवार असुन त्यांचे निधनाने जिल्ह्यात सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रध्दांजली