प्रतिष्ठा न्यूज

रविवारी बेडग येथे खुल्या एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धा

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : सेवा प्रतिष्ठान बेडग, आणि सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना यांचे संयुक्त विद्यमाने तसेच केपीज चेस अकॅडमी, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली, एकदिवसीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धा  रविवार २२ जानेवारी रोजी बेडग येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियम स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात घेणार आहेत. श्री.सिद्धेश्वर मंगल कार्यालय, मालगाव रोड, बेडग. तालुका मिरज या ठिकाणी स्पर्धा सकाळी ०९:३० वाजता सुरु होईल.
   स्पर्धेची वैशिष्टे म्हणजे बेडग येथे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. रोख तीस हजार रूपये पेक्षा जास्त  बक्षिसे तसेच आकर्षक चषक विजेत्यांना ठेवला आहे. विजेत्या खेळाडूला पाच हजार रुपये आणि चषक, उपविजेत्याला चार हजार रुपये आणि चषक तसेच तृतीय क्रमांकास तीन हजार रुपये आणि चषक. खुल्या गटात एकूण १५ बक्षिसे रोख आणि चषक  , तसेच सांगली जिल्हा उत्कृष्ट १० खेळाडूंना  रोख ₹ ३००/- आणि चषक,
तसेच महिला खेळाडूं , ज्येष्ठ खेळाडू, तसेच विकलांग खेळाडू अशा कॅटेगरी मध्ये प्रत्येकी दोन उत्कृष्ट खेळाडू यांना रोख ₹ ३००/- आणि चषक.
सोबतच  अनुक्रमे ७, ९, ११, १३, १५ अशा वयोगटात प्रत्येकी उत्कृष्ट पहिल्या तीन खेळाडूंना ₹ ३००/-  रोख पारितोषिक आणि चषक तसेच चौथ्या क्रमांका पासून ते दहाव्या क्रमांकाच्या खेळाडूंना चषक देण्यात येणार आहे. एकूण वयोगटात तब्बल ५० पारितोषिके मिळणार आहेत. ग्रामीण भागात खेळाला चालना मिळावी म्हणून बेडग पंचक्रोषीतील उत्कृष्ट पहिल्या ५ खेळाडूंना रोख ₹ ३००/-  आणि चषक तसेच चौथ्या क्रमांका पासून दहाव्या क्रमांकाच्या खेळाडूंना चषक  मिळणार आहे. सर्व खेळाडू आणी उपस्थितांना दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.
 स्पर्धेची नाव नोंदणी ऑनलाईन होणार आहे.  नाव नोंदणी मुदत २१जानेवारी सायंकाळी ०६:०० पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी केपीज चेस अकॅडमी,आणि मुख्य पंच पौर्णिमा उपळावीकर – माने, विजयकुमार माने यांच्याशी संपर्क साधावा.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.