प्रतिष्ठा न्यूज

धोतरात साप सोडणार या दिलेल्या इशारामुळे राज्यपालांनी दिला राजीनामा : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोशारी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच बार करत होते व त्यांचा वापर केला गेला त्यांच्या तोंडातून केलेले वक्तव्य हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लिहून दिलेल्या वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोषारी करत होते. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच बहुजन समाजातील महापुरुषांचा तिरस्कार करत होते हे वेळोवेळी दिसून आले आहे.व त्यांना बदनाम करणे हेच एकमेव षडयंत्र राज्यपाल कोशारी यांच्या माध्यमातून करत होते.कोल्हापूर येथे 16 फेब्रुवारीला राज्यपाल कोषारी येणार होते परंतु मराठा स्वराज्य संघाच्या वतीने ज्या ठिकाणी राज्यपालचा कार्यक्रम होणार होता त्या ठिकाणी स्टेजवर जाऊन त्यांच्या धोतरात विषारी साप सोडण्याचा इशारा मराठा स्वराज्य संघाच्या वतीने दिला होता याचीच धस्ती,भीती महाराष्ट्र सरकारला होती या वक्तव्याची राज्याचे मुख्यमंत्री यांनी दखल घेऊन भगतसिंग कोशारी यांचा राजीनामा घेऊन नवीन राज्यपालाची घोषणा केली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि या पुढील काळामध्ये नवीन येणाऱ्या कुठल्याही राज्यपालाने आमचे दैवत ,महामानव, महापुरुष यांच्यावर कुठल्याही खालच्यापातळीमध्ये टीका करू नये. तसेच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची बदली झाल्याबद्दल पेढे वाटून ,फटाके फोडून आनंद उत्सवही साजरा केला गेला या वेळेला मराठा स्वराज्य संघाचे राजे प्रवक्ते माननीय संतोष पाटील, शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, कुपवाड शहराध्यक्ष सत्वशील पाटील अनमोल पाटील सुशांत कदम, स्वप्निल शेटे, सागर बडोदेकर ,अविनाश जाधव व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या वेळेला गुलालाची उधळण केली गेली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.