प्रतिष्ठा न्यूज

लोहा-गंगाखेड रोडवर बस व मोटारसायकलची समोरासमोर धडक : नातु व आजोबा जागीच ठार

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
नांदेड : लोहा ते गंगाखेड मार्गावर मालेवाडी पाटीजवळ दुचाकी आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आजोबा आणि नातु दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी घडली आहे.
पालम तालुक्यातील रावराजुरा येथील तरूण श्रीनिवास शिंदे वय- 22 वर्षे हा आपले आजोबा शिवाजी शिंदे वय- 70 वर्षे यांना दवाखान्यात घेऊन जात होता. मात्र याचवेळी नांदेडकडे जाणारी परिवहन महामंडळाची बस क्र.एमएच 40 एन- 9901 ही समोरुन येत होती. यावेळी मालेवाडी पाटीजवळ बस आणि मोटार सायकलचा समोरासमोर अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दोघांनीही जागेवरच प्राण सोडले. गावकऱ्यांनी मृतदेह गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. आजोबा आणि नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच रावराजुरा येथील गावकऱ्यांनी गंगाखेड येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या अपघातामुळे रावराजुर गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.