प्रतिष्ठा न्यूज

महादेवाला हिरवी शाल घालण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा मुसलमानांचा प्रयत्न !

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : 13 मे च्या रात्री 9.41 वाजता स्थानिक ऊरुसाच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत काही मुसलमानांनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी पिंडीवर हिरवी शाल चढवायची आहे, असा आग्रह धरला. मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी या मुसलमानांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला. त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे स्थान हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असून ही घटना गंभीर आहे. यातून जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरी या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केली आहे. या मागणीसाठी 17 मे या दिवशी प्रारंभी बसस्थानकाशेजारी असलेल्या वटेश्वर मंदिरात शंकराच्या पिंडीला अभिषेक घालण्यात आला. नंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी स्वीकारले.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, युवासेना तालुकाअधिकारी श्री. संतोष चौगुले, उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. शिवानंद स्वामी, हिंदू एकताचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचे अधिकार हे हिंदु धर्मीयांनाच देण्यात आले आहेत. तरी अहिंदूंनी अशी कृती करणे म्हणजे सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न आहे, असे श्री. घनवट म्हणाले. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून अमरावती, संभाजीनगर, अकोला येथे घडलेल्या घटना पहाता नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संदर्भात झालेली घटना ही जाणीवपूर्वक सामाजिक तेढ वाढवणारी आहे. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे मोठे षडयंत्र असू शकते. त्यामुळे संपूर्ण राज्यात कुठेही असे प्रकार होत असतील, तर त्यात तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.