प्रतिष्ठा न्यूज

सांगलीचे प्रख्यात हृदय रोग तज्ञ डॉ.रवींद्र सांगोलकर यांची सावळसिध्द डायग्नोस्टिक सेंटर व सिद्धेश्वर सोनोग्राफी सेंटरला भेट

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज : सांगलीचे प्रख्यात कार्डीओ लॉजिस्ट, हृदय रोग तज्ञ डॉ.रवींद्र सांगोलकर यांनी सावळज येथील श्री सावळसिध्द डायग्नोस्टिक सेंटरला भेट दिली तसेच यावेळी गरजू रुग्णांसाठी ह्र्दयाच्या संदर्भातील विविध तपासण्या व मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने ई सी जी, (ECG), 2 डी इको (2D ECHO) या तपासण्या करण्यात आल्या तसेच ज्या रुग्णांना छातीत दुखणे, छातीत धडधड होणे, दम लागणे, उच्च रक्तदाब, लवकर थकवा येणे, अशी लक्षणे दिसून येत असतील तर वेळीच आपल्या हृदयाची तपासणी करून घ्यावी असा सल्ला डॉ. रवींद्र सांगोलकर यांनी या वेळी दिला.
डॉ. सांगोलकर यांच्या सांगली येथील सांगोलकर हार्ट केअर सेंटर मध्ये ई सी जी, 2 डी इको, टी एम टी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेस मेकर, या सुविधा उपलब्ध असून या संधीचा रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन या वेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास गरजू रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गरजू रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
तसेच या पुढील काळात गरजू हृदय रोग रुग्णांसाठी आनंदाची बातमी म्हणजे प्रख्यात हृदय रोग तज्ञ डॉ. सांगोलकर हे सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी सावळज येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळेत भेट देणार आहेत तरी गरजू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी प्रख्यात हृदय रोग तज्ञ डॉ. रवींद्र सांगोलकर यांचा हृदय सत्कार सावळज येथील प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. राजेंद्रसिंह रजपूत, डॉ.संदिप तारळेकर, डॉ.सचिन देसाई, डॉ. श्रीकांत माने, तसेच पत्रकार अनिल (भाऊ) शिंदे आदी मान्यवर मंडळींच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास गरजू रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.