प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या श्रींचें 246 व्या तारुण्य वर्षात पदार्पण… हजारो भाविकांनी शुभेच्छा देऊन घेतले आशीर्वाद…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : श्री गणपती पंचायतन देवस्थान तासगावच्या श्री गणेशाचा  245 वा वाढदिवस आज विधिपूर्वक साजरा करण्यात आला.श्री मंदिराचे संकल्पक आणि संस्थापक श्रीमंत सर सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन यांनी इसवी सन 1779 मध्ये फाल्गुन शुक्ल 2 शके 1701 या शुभ दिनी श्री गणपतीरायांची प्रतिष्ठापना तासगावात केली.परशुराम भाऊंनी प्राणप्रतिष्ठापना दिन हा श्रींचा वाढदिवस म्हणून साजरा करण्याची 245 वर्षांपूर्वी परंपरा सुरू केली असून त्यात आजपर्यंत कोणताही खंड पडलेला नाही.त्यानुसार यंदाचा 245 वा वाढदिवस आज साजरा झाला असून श्रींनी 246 व्या तारुण्य वर्षात पदार्पण केल आहे.त्या निमित्ताने आज सकाळी दुग्धाभिषेक तसेच 108 विविध द्रव्यांनी श्रींना अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर होमहवन होऊन दुपारी कीर्तणाचा कार्यक्रम झाला.सायंकाळी भाविकांच्या आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या अतिशबाजीत श्रींचा छबिना पार पडला.यावेळी विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी गेल्या 245 वर्षापासून अखंडितपणे वाढदिवस साजरा करण्यात येत असून त्यात आतापर्यंत कुठलाही खंड पडलेला नाही,तसेच वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश असा की लोकांच्या भक्तीत वाढ व्हावी,गाव समृद्ध व्हावं,गावाची प्रसिद्धी व्हावी असल्याचे सांगितले.आज हजारो भाविकांनी  मंदिरात उपस्थित राहून श्रीना भक्तीपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.आजच्या सोहळ्याचे आयोजन श्री गणपती पंचायतन देवस्थान ट्रस्ट विश्वस्त राजेंद्र परशुराम,सौ.सितारा राजेंद्र पटवर्धन,राहुल राजेंद्र पटवर्धन,महाव्यवस्थापक पवनसिंह कुडमल,अथर्व जोशी,अशोक कुंभार पंडित अनंतशास्त्री आणि दिपकशास्त्री जोशी यांनी केले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.