प्रतिष्ठा न्यूज

जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मराठा महिलांचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजातील महिला दि.29 सप्टेंबर 2023 पासून साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आले आहे.
यात डॉ.विद्या पाटील, मीनाक्षी पाटील,‌ सुचिता जोगदंड, डॉ. स्मिता कदम, अरुणा जाधव, सोनाली देशमुख, अर्चना होगे, कल्पना चव्हाण, कृष्णा मंगनाळे, सुरेखा रावणगावकर, संगीता सूर्यवंशी, शैलजा पाटील, अनुराधा खारघे पाटील, सुमिता गायकवाड, संतोषी पवार, राणी दळवी, संगीता डक, सुचिता बनगाणे, सुनिता कल्याणकर, शुभलक्ष्मी सूर्यवंशी, मीरा कोरडे, ज्योती पाटील, कविता वानखेडे, जयश्री ढेम्बरे, रुक्मिणी बासवडे यांच्यासह अनेक मराठा महिलांनी यात सहभाग घेतला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.