प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2023-24 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (Mid Season Adversity) अधिसूचना लागू केली आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये माहे- जुलै2023 मध्ये अतिवृष्टीमुळे व माहे- ऑगस्ट 2023 मध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे, अशा वेळी जिल्ह्यातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनास तात्काळ अधिसूचना काढणे बाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार समितीमार्फत जिल्ह्यातील सर्व शेती पिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकते मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे.तेंव्हा पिक विमा शासन निर्णयानुसार हंगाम कालावधी मध्ये प्रतिकूल परिस्थिती उदा.पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकन्यांना 50 टक्के मर्यादिपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.
समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (Mid Season Adversity) अधिसूचना लागू केली असून सर्व पात्र शेत विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाई आगाउ रक्कम अदा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी- मा.अभिजित राऊत यांनी विमा कंपनीस दिले आहेत.
अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.