प्रतिष्ठा न्यूज

राउतखेडा फाटा येथे ऑटो- दुचाकी धडकेत दोघांचा मृत्यू : आरोग्य विभागाची टोल फ्रि क्र.108 क्रमांकाची रुग्ण सेवा कुचकामी

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : कौठा ते नांदेड रस्त्यावर राउतखेडा फाटा येथे ऑटो व दुचाकीच्या धडकेत दोन ठार झाल्याची घटना दि 01 जानेवारी 2023 रोज रविवारी सायंकाळी 6:30 घडली आहे.
पेठवडज आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गोणार येथील आरोग्य उपकेंद्रात सेविका या पदावर मुलीला रुजू करून परतणारे भोकर तालुक्यातील ताटकळवाडी येथील हुलबा देवराव खुपसे वय (65 ) वर्षे हे ऑटोरिक्षा- (क्र.एम.एच.26 जी. 6368) ने गावाकडे परत येत होते. रविवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास राऊतखेडा फाटा वळणावर ऑटोरिक्षा आणि दुचाकी- (क्र. एम.एच.26 ए.जी. 9515) ची जोराची धडक झाली. असता दुचाकीवरील आनंदा नवघरे वय (52) वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला, तर ऑटोरिक्षातील हुलबा खुपसे यांना मुखेड उपजिल्हा रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला, तसेच ऑटोरिक्षातील गजानन हुलबा खुपसे वय (24) वर्षे हा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविन्यात आले आहे.
या भीषण अपघातानंतर मदतीसाठी काही उपस्थितांनी टोल फ्रि नं 108 क्रमांकावर फोन केले. परंतु अनेकवेळा प्रयत्न करूनही फोन उचलण्यात आला नाही. त्यामुळे जखमींना वेळेवर 108 ही रुग्णवाहिकांनी उपलब्ध झाली नाही. त्यामुळेही सेवा कुचकामी असल्याचे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.