प्रतिष्ठा न्यूज

राज्य नाट्यस्पर्धेत वैयक्तिक 4 पारितोषिकांसह ‘शमा’ प्रथम

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचनालय आयोजित 61 व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत सांगली-सातारा केंद्रातून नटराज फाऊंडेशन, सांगली या संस्थेच्या ‘शमा’ या नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. तसेच सूर्यरत्न युथ फाऊंडेशन, नायगांव, सातारा या संस्थेच्या ‘आपुलीचा वाद आपणासी’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सांगली-सातारा केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे आहेत. पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट, सातारा यासंस्थेच्या ‘वटवट सावित्री’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
दिग्दर्शन प्रथम पारितोषिक विनोद आवळे (नाटक- शमा), द्वितीय पारितोषिक सिध्देश नेवसे (नाटक- आपुलाची वाद आपणासी), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक यश नवले (नाटक- अंत्यकथा), द्वितीय पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- एकच प्याला), नेपथ्य : प्रथम पारितोषिक सिध्देश नेवसे (नाटक- आपुलाची वाद आपणासी), द्वितीय पारितोषिक प्रताप सोनाळे (नाटक-अंत्यकथा), रंगभूषा : प्रथम पारितोषिक प्रसाद गद्रे (नाटक-अंत्यकथा), द्वितीय पारितोषिक किशोरी साळुंखे (नाटक- शमा) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक अथर्व तारकुंडे (नाटक- आपुलाची वाद आपणासी) व वैष्णवी जाधव (नाटक-अंत्यकथा), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शुभांगी चव्हाण (नाटक- शमा), प्राजक्ता दयाळ (नाटक-वट वट सावित्री), रत्नेषा पोतदार ( नाटक- शमा), वैष्णवी जाधव (नाटक-गजर), भाग्यश्री कुलकर्णी (नाटक-एकच प्याला), विजय काटकर (नाटक-बदला गं माझा दादला), उदय गोडबोले (नाटक- बाकी शुन्य), आदित्य जोशी (नाटक- खिडक्या), परेश पेठे (नाटक- एकच प्याला) राजेश मोरे (नाटक- वटवट सावित्री).

दि. १५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत विष्णूदास भावे नाटयमंदिर, सांगली व श्री शाहू कलामंदिर, सातारा येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून सुहास वाळुंजकर, विश्वास देशपांडे आणि चंद्रशेखर भागवत यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.