प्रतिष्ठा न्यूज

ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक या तिन्ही स्तरांतून मूल्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यास मानवाचा विकास होतो : शिविअ- एन.एम.दूधमल

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- शिक्षण हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून तो राष्ट्रीय कार्यक्रमाचा कणा आहे. राष्ट्रीय वृत्ती व राष्ट्रीय व्यक्तीमत्त्व यांची वाढ करणे, व्यक्तींमध्ये मूल्यांक संस्कार घडवणे, तसेच ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक या तिन्ही स्तरांतून मूल्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यास मानवाचा विकास होते असे मत नूतन शिक्षण विस्तार अधिकारी- मा.एन.एम.दुधमल यांनी व्यक्त केले आहे.
चौफळा बिट क्र.3 मधील सर्व व्यवस्थापनाच्या शाळातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय गाडीपुरा येथे घेण्यात आली. पुढे मार्गदर्शन करताना मा.दुधमल म्हणाले की माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते. म्हणूनच जीवनात जर चांगली व यशस्वी माणसं भेटली तर त्यांच्याशी जरुर मैत्री करावी. कारण कधीही Quantity पेक्षा Quality खूप महत्वाची असते असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित मुख्याध्यापक व प्रतिनिधी शिक्षकांना- युडायस प्लस मधील शाळेतील ड्रॉप बॉक्स मधील विध्यार्थी कमी करणे, शाळांनी युडायस प्लस सर्टीफायड करून घेणे, आरटीई 25 टक्के रजिस्ट्रेशन करणे, नवभारत साक्षर परीक्षा घेणे व गुणनोंद उल्हास ॲप मध्ये करणे सह अनेक मुद्यांविषयी मार्गदर्शन केले.
प्रथम मा.एन.एम.दुधमल यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल चौफाळा बिटच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक डॉ.गिरीश पटेल, जी.एच.गंड्रस पाटील, व्ही.जे.सिरसाट, मुजाहेद सिद्दीकी, फिराज तहमीन हाश्मी, एम.डी.कळसकर, एस.एस.दाचावार, मो. इम्रान, के.एम.हत्ते, एस.एम.किसवे, एस.जे.राजुरे, अजीम शेहनाज, अब्दुल मुतेलब, एस.एल.चौडेकर, एम.एफ.शेख, व्ही. जी.जोंधळे, अशोक सोनपारखे, उन्हाळे मॅडम, कौसर बेगम, सह अनेकांची उपस्थिती होती. या सहविचार सभेचे सूत्रसंचालन व आभार बालाप्रसाद काबरा यांनी केले मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.