प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आरक्षण उपोषणाला जाहीर पाठिंबा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गेल्या अनेक दिवसापासून श्री.मनोज जरांगे पाटील सह अनेक मराठा बांधव मराठा समाजास ओबी सी आरक्षण मिळावे म्हणून शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करत आहेत, आरक्षण मिळावे यासाठी अनेकांनी आपला जीव सुद्धा गमावला आहे.त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सरकारने तातडीने मिटवून मराठा समाजास न्याय द्यावा यासाठी तासगाव शहरात आमरण उपोषण सुरु आहे, त्याला तासगाव शहर आणि तालुक्यातील मुस्लिम बांधवानी एकत्र येऊन पाठिंबा दिला.यावेळी तासगाव मुस्लिम समाजाच्या वतीने आरक्षण मिळावे यासाठी ज्या मराठा बांधवानी आपला जीव गमावला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी मुस्लिम समाज हा मराठा बांधवांचा लहान भाऊ म्हणुन मराठा समाजाच्या बाजूने व आरक्षणाच्या बाजूने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिल अशी ग्वाही देऊन मराठा बांधवांच्या उपोषणाला निवेदन देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.