प्रतिष्ठा न्यूज

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारीच्या अनेक फायली जळून खाक: या प्रकरणा विषयी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत्या…..

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या बचत भवनमधील गुंठेवारी विभागाला आज दि.15 डिसेंबर 2022 रोज गुरुवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत हजारो फाईल जळून खाक झाल्या आहेत. आग लागली की लावली याबद्दल तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
नांदेड मनपा अंतर्गत गुंठेवारीचे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलेले असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामीण भागातील गुंठेवारीच्या कार्यालयाला आग लागल्याने जिल्ह्यात तर्कवितर्क व्यक्त केल्या जात आहेत. मागील काही दिवसांपासून गुंठेवारी बंद असल्याने अनेक फायली प्रलंबित होत्या. त्यामुळे मालमत्तांची, शेती, प्लॉटची खरेदी- विक्री ठप्प होती. वेळीच फायली निकाली निघाल्या असत्या तर ही मोठी हानी टळली असती. विशेष म्हणजे या आगीसोबतच कार्यालयातील संगणक कक्ष व आदी साहित्यही जळून खाक झाले. ही माहिती मिळताच मनपाचे अग्निशमन दल अधिकारी हे आपल्या वाहन व सहकाऱ्यांसह आगस्थळी पोहचले व त्यांनी आग थांबविण्यात यश मिळविले, अन्यथा कार्यालयातील एसी व अन्य साहित्यही जळून खाक होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले असते.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही आगीच्यास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आग नेमकी कशी लागली याची चौकशी करण्याचे आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.तसेच यावेळी वजिराबाद पोलिसांनी आग लागलेल्या स्थळी भेट देऊन या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.