प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र ओलंपियाड परीक्षेसाठी राज्यातून सर्वाधिक विद्यार्थी परिक्षेस बसविणारे भडके काॅम्प्युटर इन्स्टिट्यूट राज्यातून प्रथम! उत्कृष्ट योगदानाबद्दल एमकेसीएल कडून श्री सुनील भडके यांचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.9 : शहरातील आनंदनगर, शारदानगर येथील भडके काॅम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक श्री सुनील रघुनाथराव भडके यांचा माॅम महाराष्ट्र ओलंपियाड परीक्षेत ,परिक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी बसविण्यात आले,त्यामुळे भडके काॅम्प्युटर इन्स्टिट्यूट चा महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक आला आहे. त्यामुळे या इन्स्टिट्यूट चे संचालक श्री सुनील भडके यांचा एम के सी एल महाराष्ट्र ज्ञान मंडळ संचालक श्रीमती डॉ. विना कामत मॅडम यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एमकेसीएल ॲनिमल 2022 मिटिंग मध्ये मॉम महाराष्ट्र ओलंपियाड मोमेंट. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रवेश करणारे नांदेड मधील भडके कम्प्युटर शारदानगर यांचा सत्कार एमकेसीएलचे संचालक डॉक्टर विना कामत मॅडमने केला.
भडके काॅम्प्युटर इन्स्टिट्यूट ने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना एम एस सी आय टी, ट्रीपल सी,संगणकीय विविध कोर्सेस चे शिक्षण दिले आहे.
तसेच अत्यंत सोप्या भाषेत संगणकीय शिक्षण दिले जाते. भडके काॅम्प्युटर चे संचालक श्री सुनील भडके यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.