प्रतिष्ठा न्यूज

तासगावमध्ये कपल कॅफे जोमात : निर्भया पथक सक्रिय होण्याची गरज

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव शहरात गेल्या अनेक दिवसापासून अवैधरित्या कॅफेच्या नावाखाली कपल कॅफे सुरु आहेत.यामध्ये अल्पवयीन मुलं आणि मुली सर्रास जात असल्याचे दिसून येत आहेत. या कॅफेमध्ये प्रेमीयुगुला साठी एक तास फक्त बसण्याची व्यवस्था आहे.यासाठी प्रेमीयुगुला कडून 100 ते 200 रुपये फक्त बसायचे घेतले जातात. या कॅफेमध्ये दोघाना बसण्या इतपत लहान लहान केबिन तयार करण्यात आली आहेत. या कॅफे मध्ये चाळे करण्यासाठी अल्पवयीन मुलं आणि मुली तासांनतास बसताना दिसत आहेत. हे सर्व राजरोस पने सुरु असताना तासगावचे निर्भया पथक कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.या अशा कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील प्रकाराला परवानगी आहे काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.