प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; मान्यवरांकडून अभिवादन; भाजपा युवानेते प्रभाकर पाटील मिरवणुकीत सहभागी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगावात महामानव विश्व भूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.गुरुवारी रात्री १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एसटी स्टँड चौकातील पुतळ्यासमोर फटाक्याच्या आतिषबाजी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.सकाळी सम्राट कला क्रीडा मंडळ व सम्राट स्पोर्ट्स च्या वतीने भीमज्योती आणण्यात आली. हि भीमज्योत सम्राट अशोक नगर,कांबळेवाडी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कल सांगली नाका,गुरुवार पेठ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते एसटी स्टँड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यत शेकडो तरुणांच्या उपस्थितीत आणण्यात आली.जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कल सांगली नाका येथे विद्युत रोषणाई करण्यात आली होती.सकाळी दहा वाजता आमदार सुमनताई पाटील व खासदार संजय काका पाटील,तहसीलदार रवींद्र रांजणे,पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे,पोलीस निरीक्षक झेंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील,  ताजुद्दीन तांबोळी,माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे,नगरसेवक बाळासाहेब सावंत,प्रा.बटू पवार सर,शहराध्यक्ष एडवोकेट खुजट,एडवोकेट तुकाराम कुंभार,अभिजीत पाटील,दत्ता हावळे, प्रमोद अमृतसागर,सूतगिरणीचें संचालक तथापत्रकार राहुल कांबळे, माजी नगरसेवक सी.पी.काका कांबळे,माजी नगरसेवक मोहन नाना कांबळे,जे के भाऊ कांबळे, भीमरावभाऊ भंडारे,जितेंद्र कांबळे, रोहन कांबळे,जाफरभाई मुजावर, तुकाराम सदाकळे,मुन्ना कोकणे, राष्ट्रवादी महिला आघाडी नलिनी पवार,शुभांगी साळुंखे,सौ उषाताई कांबळे,शीला पाटील,पुनम माळी, महेंद्र कांबळे ई.उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी फटाक्याची आतिषबाजी करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचीं रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने महिला भगिनींचा तरूण युवकांचा सहभाग होता.यावेळी भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. यावेळी माजी नगरसेविका सारिका कांबळे,सौ वर्षा राहुल कांबळे,निवास कांबळे,सनी कांबळे,प्रमोद कांबळे, प्रकाश कांबळेसाहेब,अभि सरवदे, आप्पासाहेब कांबळे सर,मिलिंद कांबळे,मिलन कांबळे,प्रकाश मराठे, रोहन बा.कांबळे,प्रा.एस टी कांबळे,कामत साहेब,किरण कांबळे भगवान कांबळे सर,गणेश कोलप, विक्रांत कांबळे,शेखर तासगावकर, अजय कांबळे,तुषार कांबळे,शुभम कांबळे,विशाल कांबळे,अनिकेत बनसोडे,सावळा कांबळे इत्यादी उपस्थित होते.मिरवणूक अत्यंत शांततेने दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निंबोरे यांनी उत्तम पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले होते.शहरांमध्ये वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे मिरवणुकीचे दरम्यान कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही.तसेच जयंतीनिमित्त डॉ.विद्यासागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.