प्रतिष्ठा न्यूज

हिंदू देवतांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांचा सांगलीत निषेध : स्वामी समर्थ महाराजांचे घेतले दर्शन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याचा सांगलीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे हिंदुत्ववादी विचारधारेच्या व हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शने केली. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी ही विधाने केल्याचे समोर आले असून त्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच देव देवतांबद्दल अवमानकारक वक्तव्य करत असताना हेच नेते हसत होते.म्हणून आज हिंदुत्ववादी विचारधाराच्या लोकांकडून सांगलीत जोरदार निदर्शने करण्यात आली.

हिंदू देव देवतांबद्दल अवमान कारक वक्तव्य करण्याच्या विरोधात निषेध करून माईघाट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन या अवमान कारक वक्तव्य करणार्‍यांवर सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, आकाश माने, समीर लालबेग, सूरज कासलीकर, संदीप ताटे, संदीप पवार, सारंग पवार सर्व पदाधिकारी, महिला आघाडी रुक्मिणी ताई अंबिगेरेआणि शिवसैनिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.