प्रतिष्ठा न्यूज

डॉ.श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर व जगातील ४२ देशांमध्ये एकाच दिवशी सामुदायिक वॉकेथॉनचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे 
सांगली :डॉ श्रीकांत जिचकार यांनी सुरू केलेल्या मधुमेह मुक्ती व  स्थुलता निवारणाचे संशोधन कार्य, डॉ.जगन्नाथ दीक्षित गेले पंधरा वर्षे पुढे नेत आहेत. डॉ.श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर व जगातील ४२ देशांमध्ये एकाच दिवशी सामुदायिक वॉकेथॉन आयोजित केलेले आहे. सुमारे एक लाख लोक एकाच वेळी पाच किलोमीटर चालणार आहेत. डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्या अडोर ट्रस्ट  तर्फे ह्या उपक्रमाचा विश्वविक्रम केला जाणार आहे. सांगलीमध्ये डॉ दीक्षित यांच्या प्रेरणेने नीता केळकर यांच्या लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे   मोफत मधुमेह मुक्ती केंद्र तीन वर्षे अविरतपणे सुरू आहे. या केंद्रात डॉ दीक्षित जीवनशैली संबंधी मोफत मार्गदर्शन केले जाते. यामधून शेकडो मधुमेह रुग्णांच्या गोळ्या बंद झाल्या आहेत व मधुमेह मुक्ती ही अनेकांना साध्य झाली आहे. वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय या जीवनशैलीनुसार डॉ दीक्षित यांनी सांगितलेला आहे त्याच्या अनुषंगाने दरवर्षी तीन महिन्याचे एक शिबिर आम्ही सांगलीमध्ये सतत आयोजित करत असतो. सांगलीतील या केंद्रातर्फे १०० रुग्णांवर  या जीवनशैलीचा वापर करून कमी होणारा मधुमेह व वजनात होणारी घट यासंदर्भात एक संशोधन पेपर जागतिक स्तरावर प्रसिद्ध होऊन त्यास मान्यता मिळालेली आहे .
            या सांगलीतील मधुमेह मुक्ती केंद्रा तर्फे ह्या विक्रमी वॉकेथॉनचे नियोजन केलेले आहे. सांगलीमध्ये १६ वेगवेगळ्या ठिकाणी व मिरज, माधवनगर, जत, तासगाव, जयसिंगपूर इत्यादी भागातून रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता हे वाॅकेथॉन होणार आहे. सांगलीमध्ये डी मार्ट, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली कॉलेज कॉर्नर, महालक्ष्मी मंदिर कुपवाड, विश्रामबाग गणपती चौक, शास्त्री चौक विजय नगर चौक, होळकर चौक ,टिळक चौक , माधवनगर राणा प्रताप चौक, अशा ठिकाणाहून अनेक गृपतर्फे हे वाॅकेथॉन होणार आहे. या वॉकेथॉन मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्यासाठी पाच किलोमीटर चालावे असे आवाहन लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्रीरंग केळकर यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.