प्रतिष्ठा न्यूज

दिंडीतून सामाजिक संदेश वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले,यांच्या मुळे वातावरण भक्तिमय

प्रतिष्ठ न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : “तुळस लावा आपल्या दारी, नाही होणार ऑक्सिजनची कमी,स्वच्छता राखा घरोघरी, विठ्ठल येईल आपल्या दारी “.अशा सामाजिक संदेश देणाऱ्या जयघोषात,वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले,यांच्या भक्तिमय वातावरणात आणि विठू नामाचा गजर’, अशा विठ्ठलमय वातावरणात विद्या मंदिर तळये  बुद्रुक  ता.गगनबावडा शाळेत विद्यार्थ्यांचा आषाढी पालखी मिरवणूक सोहळा रंगला.
विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम,संत रामदास व अन्य संतांच्या वेशभूषा वेष परिधान केलेले विद्यार्थी सोहळयात आकर्षण ठरले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ढोल-ताशांच्या गजरात आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला..ठिक-ठिकाणी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.ज्ञानाच्या मंदिरात विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.
ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे गायन करत टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य व फुगडी चा ठेका,अशा भक्तिमय वातावरण, या नयनरम्य सोहळ्याची सांगता विठ्ठल  मंदिरात झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे  मुख्याध्यापक  विलास कांबळे  शिक्षक  बाजीराव जाधव,  संजू माहूरे, अंगणवाडी सेविका शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ, पालक,विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.