प्रतिष्ठा न्यूज

तासगाव इनरव्हील कडून ‘हॅपी स्कुल’ उपक्रमांतर्गत न.प.शाळेस शालेय साहित्य…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जीवनात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते याचा प्रत्यय तासगाव येथील इनरव्हील क्लब तासगावने राबवलेल्या ‘हॅपी स्कूल’ उपक्रमातून आला.तासगाव नगरपरिषदेच्या संत एकनाथ महाराज प्राथमिक विद्यालयास आवश्यक असणारे साहित्य देवून शाळेची डागडुजी इनरव्हील क्लबच्या वतीने करण्यात आली.या साहित्यांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी संपन्न झाला.यावेळी पीडीसी नंदा झाडबुके,इनरव्हील क्लब तासगाव अध्यक्षा शैलेजा पवार यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या.इनरव्हील क्लब कडून ‘हॅप्पी स्कूल’ उपक्रमांतर्गत या शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर,स्वच्छता गृहांमध्ये पाण्याची सोय व प्लंबिंगची व्यवस्था करून मोडलेले दरवाजे नवीन लावण्यात आले.खिडक्यांच्या फुटलेल्या सर्व काचा नवीन बसवून शाळेसाठी कपाटाची व्यवस्था करून दिली. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटई, ग्रंथालयासाठी पुस्तके देण्यात आली, शाळेचा नामफलक तयार करून देण्यात आला,शुज रॅक देण्यात आले. खराब झालेल्या भिंतींचे  रंगकाम करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना हायजिन कीट देण्यात आले.शालेय वस्तूंचे लोकार्पण गुरुवारी विद्यार्थी व पालकांच्या उपस्थित करण्यात आले.प्रसंगी,आपणास मिळालेल्या भेटवस्तू पाहून विद्यार्थी व पालक भावुक झालेचे पाहायला मिळाले. यावेळी इनरव्हीलच्या सचिव सुनंदा पाटील,वंदना पाटील,सदस्या योगिनी नाईक,वंदना घनेरे,स्मिता औताडे, प्रिया जाधव,विनया पाटील,उज्वला पेटकर,सुषमा पेटकर,सुनिता पाटील, अंजली पाटील,रुपाली मिरजकर, रिद्धी नाईक,स्नेहा तेली,मीनाक्षी जाधव तसेच नगरपरिषदेच्या श्वेता कुंडले,भोसले,राजेंद्र माळी,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शाळेच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक, विद्यार्थी-पालक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.