प्रतिष्ठा न्यूज

परमोरी येथे जागतिक मृदा दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज /जावेद पिंजारी
कसबे वणी दि.5 :दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावामध्ये के. के. वाघ कृषि महाविद्यालयाच्या कृषि दूतांद्वारे ग्रामस्थ, शेतकरी व जि. प. प्रा. शा. परमोरी च्या विद्यार्थ्यासमवेत जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.
कृषि दुतांनी जागतिक मृदा दिनानिमित्त मृदेचे असलेले अनन्यसाधारण महत्व, जागतिक मृदा दिन साजरा करण्यामागील हेतू, त्यामागील विचार ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, तसेच सध्याच्या काळात ‘नैसर्गिक व मानवीय कारणांमुळे होणारा मृदेचा ह्यास व ते रोखण्यासाठी मृदा संवर्धनाचे उपाय व महत्व’ यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना आपल्या जीवनात मृदेचे असलेले महत्त्व सांगणे व त्यासाठी मृदेची निगा राखण्यास प्रवृत्त करणे हा या मागील मुळ उद्देश आहे.
कृषिदुत महेशसिंग राजपूत, सौरभ पाटील, सिद्धेश मटाले, संकेत मुसमाडे, तीर्थराज रिके, अथर्व नागराज, प्रज्वल पवार, जतिन पाटील यांनी या विषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमाला जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती ठाकरे व शिक्षक श्री एम. नौशाद अब्बास, शिक्षिका श्रीमती शकुंतला रौंदळ, शालेय व्यवस्थापन समिती परमोरीचे चे अध्यक्ष श्री.गणेश गांगोडे , सुरेश दिघे व ग्रामस्थ उपस्थित होते. यासाठी शिक्षक श्री एम. नौशाद अब्बास (जि.प. शाळा, परमोरी) यांचे विशेष सहकार्य लाभले. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एम. हाडोळे, कार्यक्रम समन्वयक प्रा. परमेश्वरी पवार आणि प्रा. तुषार उगले यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.