प्रतिष्ठा न्यूज

तासगावात जिवा शिवा सेना प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे प्रा.डॉ बाबुराव गुरव यांच्या हस्ते उदघाटन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तंत्रज्ञानाच्या युगात पारंपारिक व्यवसाय लोप पावत चालले आहेत,अनेक व्यवसायात भांडवलदार उतरत आहेत,छोट्या व्यावसायिकांना जगणं मुश्किल होऊ लागले आहे त्यामुळे नाभिक समाजातील मुलांनी शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे,स्वतःचा आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.बाबुराव गुरव यांनी केले. तासगाव येथे नव्याने स्थापन झालेल्या जिवा शिवा सेना प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे व नामफलकाचे उदघाटन प्रा.डॉ.गुरव यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव होते.प्रारंभी वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा.डॉ.गुरव पुढे म्हणाले,नाभिक समाजात अनेक महान व्यक्ती होवून गेल्या आहेत.संत सेना महाराज,वीर शिवा काशीद,जिवा महाले,कर्पूरी ठाकूर,हुतात्मा सांडू वाघ,भाई कोतवाल,राम नगरकर अशा व्यक्तींची पुस्तके उपलब्ध करुन अभ्यासावीत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून चांगले उपक्रम हाती घ्यावेत यासाठी आपण मार्गदर्शन करू,यावेळी त्यांनी संस्थेचे सभासदत्व स्वीकारले.स्वागत व प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ यांनी केले,आभार सचिव सुमित माने यांनी मानले.यावेळी तासगाव शहराध्यक्ष रोहित गायकवाड,विनायक गायकवाड,नागेंद्र गायकवाड,सोपान गायकवाड,तसेच रमेश गायकवाड सागर गायकवाड,राजेश गायकवाड,अमित वास्के,विष्णू गायकवाड,नंदकुमार जाधव,प्रभाकर गायकवाड,सुभाष जाधव,धनाजी जाधव,वैभव क्षीरसागर,दत्ता साळुंखे,मारुती सूर्यवंशी,यांच्यासह सभासद उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.