तासगावात सोमवारी R R मॅरेथॉनचा थरार.. एक लाखाची आकर्षक बक्षीसे
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आमदार सुमनताई पाटील यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचें युवानेते रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तासगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचें उपाध्यक्ष अक्षय धाबुगडे यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सर्व सेल,आर आर पाटील स्पोर्ट्स क्लब,क्रांती फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य R R मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवारी होणाऱ्या या मॅरेथॉन मध्ये प्रवेश पूर्णपने मोफत असून पहिल्या 1000 नोंदणीकृत स्पर्धकांना मोफत टी शर्ट देण्यात येणार आहेत. शहरातील सिद्धेश्वर चौक येथून सकाळी ठीक सात वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.यात वयोगट 11तें 14 तसेच 15 तें 18 आणि खुला गट अशा स्पर्धा होणार आहेत.विजेत्यांना 1,00,000 रुपयांची आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी नोंदणी करावी असे आवाहन उपाध्यक्ष अक्षय धाबुगडे यांनी केले आहे.