प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर यात्रेसाठी नांदेड एस टी विभागामार्फत जादा 250 बसेस सोडण्यात येणार

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : महाराष्ट्रातील पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त जूनच्या शेवटच्या आठवड्यात यात्रा भरणार आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी दिंडीने जात असतात. परंतु ज्यांना पायी दिंडीने पंढरीला जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.
बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूर यात्रेसाठी जाणारे वारकरी, प्रवासी यांच्यासाठी जिल्ह्यातील विविध आगाराच्या परिसरातील गावातून थेट पंढरपूर जाणे व परत येणे यासाठी ४० ते ४५ भाविकांचा समूह तयार करणे आणि एसटी आगार प्रमुख किंवा बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधल्यास खास बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
आगार निहाय बसेसचे नियोजन या प्रमाणे नांदेड आगार -५०, भोकर- २६, किनवट -१६, मुखेड -३६, देगलूर -३१. कंधार- ३६. हदगाव- २१. बिलोली -२६. माहूर -८. अशा एकूण २५० बसेस पंढरपूर यात्रेसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून भाविकांनी बसस्थानक प्रमुख किंवा एसटी आगारप्रमुखांशी दि. २५ जून ते दि. ४ जुलै दरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन एसटीच्या नांदेड विभागामार्फत करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.