प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, मिरज कडून सैनिकांना राख्या

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, मिरज मध्ये रक्षाबंधन सन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणानिमित्त मुलांनी व शिक्षकांनी विविध गाणी सादर करून भाऊ बहिणी च्या रक्षाबंधन सनाचे महत्त्व मुलांच्या समोर सादर केले.
याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिकानी सर्व शिक्षकांना राखी बांधून बहिणीचे प्रेम व्यक्त केले व आपली संस्कृती जपली. तसेच शाळेतील विद्यार्थिनीनी विद्यार्थ्यांना राखी बांधून बहिणीचे प्रेम व्यक्त करून आपली संस्कृती जपली आहे.
या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सैनिकांना रक्षाबंधनासाठी प्रत्येकी एक राखी सैनिकांना दिली. मुलांनी दिलेल्या या राख्या एकत्र करून जिल्हा सैनिक कार्यालय या ठिकाणी शाळेच्या वतीने सुपूर्त केल्या.
या कार्यक्रमास शाळेच्या अधीक्षिका ख्रिस्टीना मार्टिन, शाळेचे प्रशासक मा. रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापक पद्मा सासनूर, समन्वयिका अश्विनी येलकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.