प्रतिष्ठा न्यूज

पीक विमा योजनेत शेतक-यांनी सहभागाची नोंदणी “आपले सरकार सेवा केंद्र” यावरच करावी : उपजिल्हाधिकारी वडदकर

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करतांना “आपले सरकार सेवा केंद्र” यावरच विमा नोंदणी करावी व आपणा कडुन सेवा केंद्राचालक जादा पैसे घेतल्यास शेतकऱ्यांनी त्या बाबतीत तक्रार केल्यास केंद्राचा परवाना रद्द करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी- मा.महेश वडदकर यांनी केले आहे.
या विषयी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते आहे कि, या वर्षी पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025- 26 या हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ 1/- रुपया भरुन PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत शेतकरी यांना भरता येईल. तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र यांच्या माध्यमातून पीक विमा भरणा केला तरी केवळ 1/- एक रुपया व्यतिरिक्त अन्य कोणतेही शुल्क सामुहिक केंद्र धारकाला देवू नये. सामुहिक सेवा केंद्र (CSC)धारकांना विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज प्रक्रिया शुल्क म्हणून रक्कम 40 रुपये देण्यात येते.
जिल्हयातील काही सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारक शेतक-यांकडून अतिरिक्त पैसे घेत असल्याचे तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. सबब जिल्हयातील सर्व सामुहिक सेवा केंद्र चालकांनी शेतक-यांकडून केवळ 1/ रुपया एवढेच शुल्क घ्यावे. सामुहिक केंद्र चालकांनी अतिरिक्त पैशाची मागणी करणे, विनाकारण विमा नोंदणी करण्यास टाळाटाळ करणे असे गैरप्रकार केल्यास शेतक-यांनी संबंधीत तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी अथवा तहसिलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात आपली तक्रार नोंदवावी. कोणताही सामुहिक केंद्र (CSC) चालक गैरप्रकार करत असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास, असा गैरप्रकार करणा-या केंद्राचा (CSC) परवाना रद्द करून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असेही निवासी उपजिल्हाधिकारी- मा.महेश वडदकर यांनी म्हटले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.