प्रतिष्ठा न्यूज

मराठा आरक्षणासाठी श्री मनोज पाटील जरांगे यांचा एल्गार: नांदेड,हिंगोली जिल्ह्यात दौरा सभेसाठी जय्यत तयारी सुरु

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार 
नांदेड: मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी मराठा आरक्षणाचे नेते श्री मनोज  पाटील जरांगे यांच्या जिल्ह्यात विविध ठिक ठिकाणी सभा होणार आहेत .मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या कित्येक  वर्षापासून लढे सुरू आहेत . महाराष्ट्रात मराठा समाजाने शासनाला जागे करण्यासाठी लाखो लोकांनी “ना भूतो ना भविष्य” असे 52 मोर्चे काढले. या आरक्षण मागणीसाठी लाखो लोक स्वंयंसूफूर्तपणे सहभागी झाले.
  मराठा समाज हा कुणबी, कष्टकरी, कामगार, मजूर शेतात घाम गाळणारा,काबाडकष्ट, शेतात मेहनतीचे काम करणारा,  घाम गाळणारा मागासवर्गीय  समाज असून आर्थिक परिस्थिती अभावी या समाजातील मुले, मुली शिक्षण ,नोकरी पासून वंचित रहावे लागत आहे . समाजातील कित्येक लोकांच्या पिढ्या पिढ्या गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत . गायकवाड आयोगाने  मराठा समाज मागासवर्गीय असल्याचा अहवाल शासनास यापूर्वीच सादर केला आहे. आरक्षण मर्यादा वाढवून   OBC-2  प्रवर्ग निर्माण करून
     मराठा समाजातील लोकांना शिक्षण व नोकरीसाठी आरक्षण मिळावे यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणाहून शांततेच्या मार्गाने उपोषणाला प्रारंभ केला आहे .आता मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा यल्गार सुरू   केला असून” अभी नही तो कभी नही याप्रमाणें समाजातील लोकांची जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे नांदेड  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.मराठासमाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील हे नांदेड जिल्ह्यातील मुखेड, नायगाव ,नांदेड वाडी पाटी या ठिकाणी लोकांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी मराठा समाजातील हजारो बांधवांनी या सभेसाठी उपस्थित राहावे .असे आव्हान सकल मराठा  संघटनेने युवक संघटनेने केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.