प्रतिष्ठा न्यूज

मारतळा येथील साखळी उपोषणाचा “नववा” दिवस उमरा ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : मराठा समाजाला सरसकट ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेले- मा.मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लोहा तालुक्यातील उमरा सर्कल मधील 24 गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून  “नवव्या” दिवसाच्या उपोषणासाठी उमरा येथील मराठा समाज बांधवांनी मोठी उपस्थिती दाखविली आहे.
सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योद्धा- मा. मनोज पाटील जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या समरणार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने उमरा सर्कल मधील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मारतळा या गावी दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता पासून अनिश्चित काळासाठी साखळी उपोषणास सुरुवात करून हा लढा अधिक तीव्र करण्यात आला आहे. दररोज एक गाव या प्रमाणे उपोषणास सुरुवात झाली आहे.
राज्य शासनाच्या वेळकाढू पणामुळे आता मराठा आरक्षणाची धक दिवसेंदिवस वाढत असून गावागावात उपोषणे सुरू आहेत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत उमरा परिसरातील 50 गावात मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय पुढार्‍यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार टाकला जाणार असे फलक व ठराव घेण्यात आले आहेत. यातून नेते व पुढार्‍यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
तर उमरा सर्कलच्या वतीने मारतळा येथे महामार्गावर मार्केट यार्डत सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने परिसरातील 24 गावातील गावकऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू असून दि.5 ऑक्टोबर 2023 रोजी उमरा येथील मराठा बांधवांनी “नवव्या” दिवसासाठी मोठा सहभाग घेतला आहे.
हे साखळी उपोषण दि.24 डिसेंबर 2023 पर्यंत चालू राहणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.