प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

संविधान वाचवण्यासाठी विशाल दादांना साथ द्या : जयश्रीताई पाटील, प्रभाग 10 मध्ये प्रचार बैठकांना मोठा प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मान सन्मान, मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. तेच संविधान आज भाजपमुळे धोक्यात आले असून संविधान वाचवण्यासाठी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनाच विजयी करा, असे आवाहन जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी केले.
सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दहा मध्ये जयश्रीवहिनी मदन भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत  बैठका झाल्या. यावेळी बोलताना जयश्री वहिनी म्हणाल्या, विशालदादांची उमेदवारी ही सांगली जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक उमेदवारी असून प्रत्येक नागरिक हा मीच विशालदादा म्हणून तळागाळात काम करत आहे. वातावरण अतिशय अनुकूल आहे. तरीसुद्धा गाफील न राहता विशालदादांचे चिन्ह बंद पाकीट (लिफाफा) सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची काम आपण करावे असे आवाहन केले.
वसंतदादा घराणे संपवण्याचा घाट विरोधकांनी घातला असून वसंतदादा घराणे संपणार नाही, आम्हाला लढाईची सवय आहे, रडायची नाही. कितीही विरोध झाला तर जनसेवेचा वसा आम्ही सोडणार नाही. शेवटपर्यंत लढू आणि जिंकू.
यावेळी प्रभाग क्रमांक दहा मध्ये माजी नगरसेवक प्रकाश मुळके, वर्षाताई अमर निंबाळकर, शेवंताताई वाघमारे, अशोक मासाळे, यशवंत माळी, राजू मुळे यांच्यासह टिंबर एरिया मर्चंड असोसिएशन या ठिकाणी बैठका पार पडल्या. या बैठकीला भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.