प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

वसंतदादांच्या नातवाला पुढच्या दारानेच जनता खासदार बनवेल : विशाल पाटील; बेडग येथे प्रचार सभा, जनतेतून उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : भाजपने समाजासमाजात भांडणे लावली, एकमेकांची डोकी फोडण्याचे काम केले. अशा भाजपच्या विरोधात आणि आरक्षणाच्या मुद्दावर बोलू शकले, असा खासदार दिल्लीत हवा. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मलाही अनेक आॅफर आल्या.  माझे बंड वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी आहे. त्यामुळे  वसंतदादांच्या नातवाला पुढच्या दारानेच जनता खासदार बनवेल, असा विश्वास विशालदादा पाटील यांनी व्यक्त केला.
सांगली लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बेडग येथे जाहीर सभा झाली. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, अमरसिंह पाटील, संजय हजारे, संजय मेंढे, बाळासाहेब ओमासे, प्रमोद इनामदार, निरंजन आवटी, तानाजी चव्हाण आदिसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
विशाल पाटील म्हणाले की, गत निवडणुकीत पराभवानंतर कामाला लागलो, लोकांमध्ये गेलो. महापुरात जनावरांना चारा, पुरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था केली.  कोरोना काळात जनतेची मोठी अडचण झाली. शासन केवळ थाळ्या वाजविण्यास सांगण्यात होते. आम्ही तेही केले, पण माणसाची जीव वाचेना म्हणून वसंतदादा साखर कारखान्याच्या माध्यमातून सॅनिटायझरची निर्मिती केली. आमचा कारखाना अडचणीत आहे. मला आडचणीत आणण्यासाठी साखर कारखाना अडचणीत आणला जातो. पण आम्ही तो विचार केला नाही. आमचे बघून इतर कारखान्यांनी सॅनिटायझर बनविले. त्यातून कोट्यवधी रुपये कमविले. आम्हाला त्यातून काहीच नको होते. एक जरी जीव वाचला असेल तर आमचे दहा, वीस कोटी फिटले ही भावना ठेवली. लोकांच्या सुखदु:खात सहभागी झालो. खासदाराविरोधात मोर्चा काढले, आंदोलने केली. मतदारसंघातील लोकांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी पायी चाललो.
त्यातच वाळूचे ट्रक सांभाळणाºया पैलवानाना खासदारकीचे वेड कुणीतरी डोक्यात घातले. ते वंचित आघाडीकडे गेले. पण प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी नाकारली. उद्धव ठाकरे कुणालाच भेट नसल्याने शिवसेनेचे ४० आमदार १३ खासदार सोडून गेले. पण एका दिवसात ते चंद्रहार पाटील यांना भेटलेही आणि उमेदवारीही जाहीर केली. ९० वर्षे काँग्रेसमध्ये करणाºया वसंतदादा घराण्याला डावलून सात दिवसात पक्षात आलेल्यांसाठी उमेदवारी देण्यात आली. हे सारे जाणिवपूर्वक घडवून आणले आहे. जिल्ह्याला बंडाची परंपरा आहे. वसंतदादांनी इंग्रजाविरोधात बंड पुकारले होते. या निवडणुकीत काँग्रेसच्या विचाराचा मी एकमेव उमेदवार रिंगणात आहे. अर्ज भरल्यावर अनेकांकडून आॅफर आल्या. पण हे बंड स्वार्थासाठी नाही. जनतेशी बेईमानी करणार नाही. मागच्या दाराने नाही तर पुढच्या दारानेच खासदार करण्यासाठी जनतेने वाट मोकळी करून दिली आहे. दमदाटी, लुबाडणुक करणारा, सातबाºयावर स्वत:चे नाव लावणारा खासदार संजयकाका पाटील यांना घरी बसवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.