प्रतिष्ठा न्यूज

फळ – भाजीपाला व्यापाऱ्यांना आवश्यक सुविधा देणार : खासदार संजयकाका पाटील; विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्यांशी साधला संवाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील फळ मार्केट मधील फळ आणि भाजीपाला व्यापाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्यात येतील, व्यापाऱ्यांनी विकासाच्या मार्गावरून चालणाऱ्या नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार खासदार संजय का पाटील यांनी केले.


सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संजयकाका पाटील यांनी आज दि. २४ रोजी येथील विष्णूअण्णा फळ मार्केट येथील फळ, कांदा बटाटा, भाजीपाला व्यापाऱ्यांशी संवाद साधला. निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सांगलीतील फळ व्यापाऱ्यांच्यासाठी आवश्यक असणारे सर्व सुविधा उपलब्ध करून व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे, युवा नेते पृथ्वीराज पवार, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघमोडे, नगरसेविका सविता मदने, संजय यमगर, कांदा बटाटा असोसिएशनचे विलास शिंदे, फळ मार्केट असोसिएशनचे अनिल अलदर, सागर मदने, गोरख तोडकर, जब्बार बागवान, समीर बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जमीर बागवान, भाजपाला असोसिएशनचे अध्यक्ष इम्तियाज पखाली, सागर मदने, कांदा बटाटा असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक गजानन आलदर, रूपामल पोपटानी, सुरज चोपडे, भारत खांडेकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.