प्रतिष्ठा न्यूज

सांगलीचा स्वाभिमान जपण्यासाठी विशाल दादांना विजयी करा…* जयश्रीताई पाटील : प्रभाग अठरा मध्ये प्रचार बैठक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली: सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 18 मध्ये प्रसाद गार्डन येथे श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लिफाफा (पाकीट) हे चिन्ह नवीन असल्याने ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे. तसेच प्रभाग क्रमांक 18 मधील जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपल्याला विशाल दादांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायची आहे असे आवाहन जयश्री वहिनींनी केले.
यावेळी माजी नगरसेवक अभिजीत भोसले, रत्नाकर नांगरे, महादेव साळुंखे, प्रतीक राजमाने, लालसाब तांबोळी, रजाक नाईक तसेच प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.