कोळी महासंघाचा संजयकाका पाटील यांना पाठिंबा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांना कोळी महासंघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. पाठिंबाचे पत्र महासंघाचे जिल्हाध्यक्ष कुमार कोळी यांनी दिले. कोळी समाजाच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांना कोळी महासंघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. कोळी समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले. कोळी समाज हा कष्टाळू प्रामाणिक आणि देशाच्या विकासात बल भर घालणारा समाज आहे. त्यामुळे या समाजाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असे संजयकाका यांनी सांगितले. यावेळी कोळी महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष कुमार कोळी, महिला प्रदेश उपाध्यक्ष रुक्मिणी अंबिगेर, शहराध्यक्ष राजेश कोळी, बिसूरचे सरपंच महेश कोळी, कोळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.