प्रतिष्ठा न्यूज

विशालदादा पाटील यांचा ‘मॉर्निंग वॉक’वेळी विकासावर संवाद : नागरिक, महिला, तरुण, वृत्तपत्र विक्रेते, हमाल, फळ विक्रेत्यांसह विविध संघटनांशी चर्चा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉक करणाºया नागरिकांशी संवाद साधत जिल्ह्याच्या विकासावर चर्चा केली. यावेळी त्यांनी आमराई व महावीर उद्यानाला भेट दिली. तसेच वृत्तपत्र विक्रेते, खेळाडू, हमाल, फळ विक्रेत्यांसह विविध संघटनांशी संवाद साधला.
पहाटे विशालदादा पाटील यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांची भेट घेतली. यावेळी विकास सूर्यवंशी, मारुती नवलाई, अमोल साबळे, विशाल रासणकर, दीपक वाघमारे, यशवंत जाधव, नारायण माळी, गणेश कटगी, नागेश कोरे, सुरेश कांबळे, सागर घोरपडे, आर. एस. माने, श्रीपती रासणकर, शिवानंद चौगुले, महावीर आष्टेकर, प्रकाश कुंभार, दत्ता चव्हाण, प्रशांत साळुंखे आदि उपस्थित होते. स्वागत मारुती नवलाई यांनी केले. विकास सूर्यवंशी म्हणाले की, वसंतदादा घराण्याने नेहमीच वृत्तपत्र विक्रेत्यांना साथ दिली आहे. राज्यातील पहिले वृत्तपत्र विक्रेता भवन सांगलीत उभारण्यास दादा घराण्याने मदत केली. कोरोना काळात विक्रेत्यांना सॅनिटायझरसह इतर सुविधाही पुरविल्या. केवळ निवडणुकीतच नव्हे तर इतर वेळीही वसंतदादा घराण्याकडून विक्रेत्यांची काळजी घेतली जात असल्याचे सांगितली. यावेळी विशालदादांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
कृष्णामाई घाटावर जलतरणासाठी आलेल्या तरुण, नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. माई घाटावरील सुविधांबाबत त्यांनी चर्चा केली. यावेळी संजय चव्हाण यांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर त्यांनी क्रीडा संघटना पदाधिकारी व खेळाडूंची भेट घेतली क्रीडांगणावरील सोईसुविधांची माहिती घेत खेळाला प्राधान्य देण्यासाठी आपण काम करणार असल्याचे ग्वाही दिली.
आमराई व महावीर उद्यान (बापट मळा) येथील मार्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिक, महिलांशी संवाद साधला. जिल्ह्यासह शहरातील विकासकामांवर त्यांनी चर्चा केली. महावीर उद्यानातील हास्यक्लबलाही भेट दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्याकडूनही हास्याचा व्यायाम करून घेतला. विशाल पाटील यांनी आपल्या उमेदवारीबाबत भूमिका नागरिकासमोर मांडली. विश्रामबाग येथील गणेश नाष्टा सेंटर येथे नागरिकांशी संवाद साधत त्यांच्यासोबत चहा घेतला. बिरनाळे कॉलेजजवळील नाष्टा सेंटरवरील नागरिकांची भेट घेतली. मार्केट यार्डातील हमाल, खोकीधारक व विष्णूअण्णा फळ मार्केटमधील फळ विक्रेत्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही विशालदादा पाटील यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.