प्रतिष्ठा न्यूज

महापुराचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन हजार पाचशे कोटींचा निधी आणलेल्या संजयकाकांनाच सांगलीकर साथ देतील : सौ. ज्योतीताई पाटील; विविध प्रभागात दौरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीकरांचा महापुराचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जागतिक बँकेकडून तीन हजार पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेल्या खासदार संजयकाका पाटील यांनाच सांगलीकर लोकसभा निवडणुकीत साथ देतील असा विश्वास सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी बोलताना ज्योतीताई पाटील म्हणाल्या, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक विकास कामे केली आहेत. सांगलीकरांचा महापुराचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जागतिक बँकेकडून 3500 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे पाठवण्यासाठी एक समिती स्थापन करून येत्या दोन ते तीन वर्षात काम पूर्ण होईल. त्यानंतर कधीही सांगलीत पूर येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्वला गॅस योजना, अमृत योजनेद्वारे स्त्रियांना सक्षम बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण खासदार संजयकाका पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूया. सांगलीकर नक्की संजयकाका पाटील यांना साथ देतील असा विश्वास आहे.
यावेळी सांगलीचे आमदार सुधीरभाऊ गाडगीळ यांच्या पत्नी सौ मंजिरी गाडगीळ, भाजपा कार्यकर्ते अतुल दादा माने, नगरसेविका खिलारे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, आयेशा शेख, रूपाली अडसुळे, संयोगिता चव्हाण, जयश्री सावंत, मीना कोळी, मीनाक्षी माने, मयुरा ढगे, जयश्री यादव, वर्षा सरगर, संगीता जाधव, सविता हुजरे, प्रणाली जाधव, हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबेकर, नीलिमा पाटील उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.