प्रतिष्ठा न्यूज

येत्या ४ जून नंतर संजय काकांची झोप उडालेली असेल : विशालदादा पाटील; गावागावात गटतट विसरून जनतेचा पाठिंबा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संजयकाका पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत दुसºयांदा हरवू, अशी वल्गना केली. अशी चांगली स्वप्ने संजयकाकांनी पहावीत. त्यामुळे त्यांना चांगली झोप मिळत असेल तर माझ्या शुभेच्छाच आहेत. येत्या ४ जूनला त्यांची झोप उडलेली असेल, असा टोला सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी लगाविला.

ते पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंतच्या प्रचार दौºयाबाबत विशाल पाटील म्हणाले की. जत, आटपाडी या दुष्काळी तालुक्याचा दौरा केला. जत पूर्व भागात अजूनही पाण्याची व्यवस्था झालेली नाही. याच भागातील गावांनी पाणी देणार नसाल तर कर्नाटकात जाऊ असा ठराव केला. जत तालुक्यातील खासदारावर नाराज लोक प्रचारात सहभागी झाले आहेत. आटपाडी तालुक्यात कागदावर विरोधकांची ताकद दिसत असली तरी जनता आमच्या पाठीशी आहे. प्रत्येक गावात गटतट विसरून रस्त्यावर उतरून उत्स्फुर्त पाठिंबा देत आहेत. तासगाव तालुक्यातही मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या अडीअडचणी खूप आहेत. विशेषत: शेतकºयांचा भाजपवर मोठा रोष दिसून आला. भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी स्वार्था पलिकडे काहीच पाहिलेले नाही. या निवडणुकीत वातावरण पाहता वैयक्तिक संजयकाकांची ताकद कुठेच दिसत नाही. जे पाठबळ आहे, ते भाजपचे आहे. त्यामुळेच संजयकाकांनी अपक्ष लढावे, असे आव्हान दिले होते.

काँग्रेस पक्षाकडून संभाव्य कारवाईबाबत विशालदादा म्हणाले की, काँग्रेसवर अन्याय झाल्यानेच कार्यकर्ते पेटून उठले आहेत. काँग्रेसच्या मेळाव्यात नेमके काय घडले हे माहित नाही. पण कार्यकर्त्यांनी संयम राखावा. मी पक्षाच्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केलेले नाही. पक्षाच्या विचाराशी ठाम आहे. वसंतदादा घराण्याने ९० वर्षे काँग्रेससाठी काम केले. पक्ष वाढीसाठी काम केले आहे. वसंतदादांच्या काळात सर्वात जास्त काँग्रेसचे आमदार, खासदार निवडून आले. वसंतदादा प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाचे सर्वाधिक १४५ आमदार निवडून आले होते. त्यानंतर एकदाही काँग्रेसला हा आकडा गाठता आलेला नाही. वसंतदादांच्या निधनानंतर काही अडचणीमुळे पक्ष मागे पडला. माझ्यावर कारवाईच्या आदेशावर सही करतानाआमच्या घराण्यापेक्षा जादा योगदान आहे का, याचा विचार करावा. मग खुला करावई करावी. मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता अहे. काँग्रेस जीवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढवित आहे. त्यामुळे माझ्यावर कारवाई होईल, असे वाटत नाही. विश्वजित कदम व आम्ही एकत्रितपणे काम करतो, हे काहींना आवडलेले नाही. पक्षासाठी काम करूनही काँग्रेसची उमेदवारी दिली गेली नाही, त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त करणे स्वाभाविक आहे. ते काँग्रेसचे नेते आहेत. निवडून आल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबतच काम करणार आहोत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.