प्रतिष्ठा न्यूज

कुमठे येथे विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी: कुमठे येथे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी कुमठे गावचे ग्रामदैवत श्री नरसिंह मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विशाल दादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी पूजा पाटील कुमठे गावच्या माजी सरपंच डॉक्टर भारती पाटील,मनीषा पाटील, छायाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, मनोज पाटील, नितीन पाटील, अच्युतराव पाटील, मा.पा.पाटील यांचा सहभाग होता.
यावेळी पूजा पाटील म्हणाल्या जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना आपण भरघोष मतांनी निवडून देऊन विकासाची संधी साधूया बऱ्याच अडचणीतून आपण हा संघर्ष करत आहे. खऱ्या अर्थाने स्वर्गीय वसंतराव दादा असतील डॉक्टर पतंगराव कदम असतील आर. आर.पाटील असतील असे अनेक दिग्गज नेत्यांचा हा जिल्हा आहे हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना अनेकांनी आपणाला अडचणीत आणण्याचे काम केले आहे.पण इथून पुढील काळात आपण आपली ताकद दाखवण्याची गरज आहे मी आपणाला नम्रपणे आव्हान करते ही उद्याची निवडणूक ही आपली आहे आपल्याला म्हणजे बंद पाकीट हे चिन्ह मिळाले आहे दिनांक 7 मे रोजी मतदान आहे या दिवशी आपण विशाल दादा पाटील यांना मतदान करून परत एकदा सांगलीची ताकद दाखवूया.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.