प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

राष्ट्रीय बंजारा परिषदेचा संजयकाका पाटील यांना पाठिंबा; बंजारोंकी ललकार-इस बार भी मोदी सरकार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राष्ट्रीय बंजारा समाज परिषदेच्या वतीने भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. पाठिंब्याचे पत्र परिषदेचे महासचिव ॲड. पंडितभाऊ राठोड यांनी संजयकाका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांना दिले.
यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल नाईक, अथणी देवस्थानचे महंत लक्ष्मण महाराज, बंजारा परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष सुरेश राठोड, संयोजक अनिल राठोड सहसंयोजक कृष्णा चव्हाण, सदस्य प्रशांत राठोड, सचिन टाठाडे, राइल टाठाडे, किरण टाठाडे तसेच भाजपाचे पदाधिकारी तासगावचे माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर, मराठा समाजाचे अध्यक्ष अभिजित पाटील, माजी नगरसेविका सविता मदने, यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रात म्हटले आहे की, बंजारोंकी ललकार-इस बार भी मोदी सरकार… अब कि बार-400 पार… मै बंजारा-मोदी हमारा… या भावनेने लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू राष्ट्र संकल्पनेसाठी जाहीर पाठिबा देण्यासाठी प्रभावित व उत्साहित आहोत. देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत.
लोकसभा मतदार संघामध्ये गोरबंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून गोरबंजारा समाजामुळे महायुतीच्या विजयाचा मार्ग सोपा होणार आहे. मताधिक्य वाढणार आहे. गोरबंजारा समाजामध्ये अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना असून या संघटनेमध्ये समाजातील धार्मिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत. गोरबंजारा समाजातील सर्व तांडे धर्मपीठाशी राष्ट्रीय बंजारा परिषदेशेमुळे जोडले गेल्याने तांडा स्तरावरील नायक, कारभारी, पुजारी व गोरबंजारा समाजाचे, तांडा समिती नायकण, महिला समिती, युवा धर्म रक्षक, गोरबंजारा धर्मपीठाचे पदाधिकारी, पालखीचे पदाधिकारी सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदेशी निगडित आहेत.

राष्ट्रीय बंजारा परिषद गोरबंजारा समाजाचे सर्वात मोठे नेटवर्क असलेली संघटना असून राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे या मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळून महायुतीचा विजय निश्वित होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.