प्रतिष्ठा न्यूज

माळी व लिंगायत समाजाचा संजयकाका पाटील यांना पाठिंबा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचारादरम्यान माळी व लिंगायत समाजाची बैठक वॉर्ड क्रमांक २० माळी समाज मंदिर येथे पार पडली. या बैठकीमध्ये संपूर्ण माळी व लिंगायत समाजाने संजयकाका पाटील यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
यावेळी खासदार संजयकाका पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जनसुराज्य युवाशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, डॉ. महादेव कुरणे, गणेश माळी, बाळासाहेब कौलपुरे, मनोहर कोरे, संभाजी नाना मेंढे, बबन भंडारे, पांडुरंग कोरे, अनिल रसाळ, डॉ. पंकज म्हेत्रे, डॉ. हेमंत म्हेत्रे, विक्रम पाटील, ईश्वर जनावडे, अनिल हरगे, बाबासाहेब अळतेकर, विनायक रुईकर, विनायक शेरबंदे, सुशील माळी, गणेश चौगुले, रमेश मेंढे आदी माळी व लिंगायत समाज बांधव उपस्थित होते
यावेळी संजयकाका पाटील यांनी सांगली जिल्ह्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आणि मोदी जी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी पाठिंबा देण्याचे जाहीर केले. माळी व लिंगायत समाजाला संजयकाका पाटील यांची नेहमीच साथ असते त्यामुळे मोठ्या मताधिक्त्याने निवडणून समाजाने सहकार्य करण्याचा निर्धार केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.