प्रतिष्ठा न्यूज

रविवार व सोमवार उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य सांगलीत : तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात मोटारसायकल रॅली

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष सांगली लोकसभा मतदारसंघ यांच्या वतीने मोदी @९ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली लोकसभा मतदारसंघातील पलूस, तासगांव कवठेमहांकाळ. सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये रविवार ११ जून व सोमवार दि 12 जून रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती सांगली लोकसभा जनसंपर्क अभियानाचे संयोजक खासदार संजयकाका पाटील यांनी दिली .
याबाबत खासदार पाटील म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली त्याअंतर्गत मोदी @९ महाजनसंपर्क अभियान सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात उत्साहात राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने उत्तरप्रदेशचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे शनिवार दि.10 सायंकाळी 4.00 वाजता पुणे विमानतळावर आगमन होईल व विमानतळावरून सांगली लोकसभा मतदारसंघाकडे प्रयाण करतील रात्री ते चितळे डेअरी प्रा.लि.भिलवडी ता.पलूस येथील गेस्ट हाउस मध्ये मुक्काम करतील. रविवार दि.11 सकाळी 9.00 वाजता चितळे डेअरी प्रकल्पास भेट व पाहणी ता.पलूस सकाळी 9.30 वाजता विकास तीर्थ भेट अंतर्गत भिलवडी रेल्वे स्टेशन पूल व भिलवडी रेल्वे स्टेशन दुहेरीकरण व विदयुतीकरण भेट,सकाळी 10.00 वाजता भिलवडी नाका तासगांव शहर येथून तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्यावतीने स्वागत व मोटारसायकल रॅलीद्वारे उपमुख्यमंत्री मौर्य यांचे जोरदारपणे स्वागत करण्यात येणार आहे व मोटार सायकल रॅलीद्वारे कार्यकर्त्यांसह तासगांवच्या प्रसिध्द गणपती मंदीरला भेट देण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी सानेगुरूजी नाटयगृह येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्यास उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह प्रमुख नेतेगण मार्गदर्शन करतील. दुपारी 2.00 वाजता तासगांवचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या घरी प्रमुख कार्यकर्ता भेट व स्नेहभोजन तसेच दुपारी 3.00 वाजता तासगांव शहरातील दाणे गल्ली येथील बोडके सांस्कृतिक भवन येथे प्रबुध्द नागरीक संमेलन व त्याचठिकाणी दुपारी 4.00 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.दुपारी 4.30 वाजता तासगांव विधानसभेतील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट व चर्चा करण्यात येणार आहे. रात्री 8.00 वाजता महाबळ फार्म हाउस मिरज येथे कार्यकर्ता स्नेहभोजन व रात्रीचा मुक्काम आहे. सोमवार दि.12 जून रोजी सकाळी 9.30 वाजता सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपती मंदीर दर्शन सकाळी 10.00 वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक राजवाडा येथील भाजपा कार्यालयात होणार आहे सकाळी 10.30 वाजता बालाजी मंदीर येथे व्यापारी संमेलन.सकाळी 11.30 वा टिळक स्मारक मंदीर येथे प्रमुख कार्यकर्ता मेळावा,दुपारी 12.30 देवगिरी हॉटेल येथे पत्रकार परिषद.दुपारी 1.00 वा विकासतीर्थ अंतर्गत सहयाद्रीनगर येथेील सहयाद्रीनगर पुलास भेट. दुपारी 1.30 वा विश्रामबाग येथील सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधिरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट, दुपारी 2.15 वा मोहन व्हनखंडे यांच्या घरी स्नेहभोजन, दु.3.15 वा वंटमुथे कॉर्नर ते सराफ कट्टा मार्गे मोटार सायकल रॅलीद्वारे शिवाजी महाराज पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर सांगली जिल्हयाचे कामगार तथा पालकमंत्री डॉ सुरेशभाउ खाडे यांच्या संपर्क कार्यालयास भेट, दुपारी 4.30 वा पटवर्धन हॉल मिरज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून संयुक्त मोर्चा व कार्यकर्ता मेळावा, सायंकाळी 6.00 वा विकास तीर्थ अंतर्गत तानंग फाटा मिरज येथे भेट देण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे सायंकाळी 6.15 वा मिरजेहून सोलापूरकडे पुढील दौ-यासाठी रवाना होणार आहे. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील दौ-यामुळे जिल्हयातील जनतेत उत्साह असून सर्वसामान्य जनता त्यांचे जोरदारपणे स्वागत करणार असल्याची माहिती शेवटी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली या दौ-याच्या तयारीसाठी माझ्यासोबत सांगली जिल्हयाचे कामगार तथा पालकमंत्री सुरेशभाउ खाडे, आमदार सुधिरदादा गाडगीळ, आमदार गोपिचंद पडळकर,भाजपा महिला आघाडी नेत्या सौ. निताताई केळकर, सांगली लोकसभा प्रमुख दिपकबाबा शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,राज्य कार्यकारीणी सदस्य मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, संग्राम (भाउ) देशमुख, तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख युवा नेते प्रभाकर पाटील, सुरेद्र (भैय्या) वाळवेकर, मोहन व्हनखंडे सर, तासगांव तालुका भाजप अध्यक्ष सुनिलभाउ पाटील, तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्राध्यक्ष स्वप्नील पाटील, तासगांव शहराध्यक्ष हणमंत पाटील हे तयारीसाठी मेहनत घेत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.