प्रतिष्ठा न्यूज

संजयकाकांच्या प्रयत्नाने खंडोबा पाझर तलावात आरफळ कॅनाॅलचे पाणी दाखल ; पलूसकरांनी केला आनंदोत्सव साजरा

प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : खासदार संजयकाका पाटील यांच्या सहकार्याने व संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष व पलुस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते श्री निलेशभैया विठ्ठलराव येसुगडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आरफळ कॅनाॅलचे पाणी खंडोबा पाझर तलावामध्ये सोडण्यात आले. यामुळे पलूसकरांना दिलासा मिळाला असून तलावाभोवती जमून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
खंडोबा पाझर तलावात पाणी आल्यामुळे परीसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रणरणत्या उन्हाळ्यात खंडोबा पाझर तलावामध्ये आरफळ कॅनाॅलचे पाणी सोडण्यात आल्यामुळे परीसरातील विहीरी, बोअरवेल यांची खालावलेली पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास मदत होणार आहे. पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पाण्यामुळे दिलासा मिळाला असून तलावाभोवती जमून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. संजयकाकांच्या प्रयत्नांना यश आल्याने नागरिकांनी संजयकाका पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.
यावेळी संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष व पलुस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते निलेशभैया विठ्ठलराव येसुगडे, पलुस औद्योगिक सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील, संग्राम सोसायटीचे संचालक राजुभाऊ भोरे, संग्राम पतसंस्थेचे संचालक गजानन (आण्णा) धुमके, प्रगतशील द्राक्ष बागायतदार संदिप धुमके, युवा उद्योजक पोपट धुमके, युवा उद्योजक चेतन धुमके उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.