प्रतिष्ठा न्यूज

संजयकाका पाटील यांचा सांगलीत घरोघरी प्रचार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.२८: सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या यांचा सांगली शहरात अगदी गल्लोगल्ली आणि घरोघरी प्रचार सुरू आहे. पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, पक्षाच्या विविध शाखांचे प्रमुख नागरिकांना भेटत आहेत. त्यांना संजयकाकांनी केलेल्या कामाची माहिती पत्रके देत आहेत.याशिवाय ठीकठिकाणी नमो सभा, कॉर्नर सभाही सुरू आहेत.
सांगलीतील आनंदनगर, उमेदनगर येथे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, कल्पनाताई कोळेकर यांनी घरोघर जाऊन प्रचार केला. संजयकाकांची माहिती पत्रके दिली.
गवळी गल्ली, रामटेकडी, सरकारी तालीम परिसर, सराफ कट्टा या भागात माजी नगरसेविका सौ.उर्मिला बेलवलकर, शक्ती केंद्रप्रमुख मोहन जामदार, पश्चिम मंडल प्रमुख सौ. स्मिता भाटकर ,कामगार मोर्चा प्रदेश सदस्य सौ. स्नेहजा जगताप, सौ. मोहिनी जामदार,सौ. मनीषा कुकडे यांनी घरोघर जाऊन नागरिकांची भेट घेतली. त्यांना संजयकाकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
प्रभाग क्रमांक १८ मधील स्वामी समर्थ मंदिर कॉर्नरवर नमो सभा झाली. या सभेत भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर इनामदार,माजी आमदार नितीन शिंदे यांची प्रमुख भाषणे झाली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संजयकाकांना पाठिंबा द्या. भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले. अमर पडळकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.