प्रतिष्ठा न्यूज

देशात रामराज्य आणण्यासाठी संजयकाकांना पुन्हा खासदार करा : केंद्रीय मंत्री भागवत कराड; वारकरी, कीर्तनकारांचा सांगलीत भव्य मेळावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधले आहे. आता त्यांच्याच नेतृत्वाखाली देशात रामराज्य येणार आहे. ते रामराज्य येण्यासाठी, मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजयकाका पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केले.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित वारकरी, टाळकरी, कीर्तनकार मेळाव्यात ते बोलत होते. वारकरी मंडळाचे सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव नवलाई अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी आमदार नितीनराजे शिंदे, भारतीय जनता पक्षाचे नेते दीपकबाबा शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सौ. नीता केळकर ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहरभाई सारडा, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर पोतदार आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
डॉ.कराड म्हणाले, मी देशाचा अर्थ राज्यमंत्री म्हणून सांगतो की पंतप्रधान मोदी यांनी या देशांमध्ये अर्थक्रांती घडवली आहे. या देशाला एक बळकट आणि समृद्ध अशी आर्थिक स्थिती प्राप्त करून दिली आहे. देश समृद्ध बळकट आणि समर्थ करण्याबरोबरच या देशामध्ये रामराज्य आणायचे आहे आणि ते फक्त मोदीच आणू शकतात. मोदींचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेची एकेक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळेच सांगलीतून संजयकाका पाटील यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने खासदार करणे गरजेचे आहे. सर्व वारकरी, टाळकरी, कीर्तनकार आणि भाविक भक्तांनी एक धर्म कर्तव्य म्हणून संजयकाकांनाच मतदान करण्याचे सर्व जवळच्या, ओळखीच्या संबंधितांना आवाहन करावे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्येही वारकरी भवन व्हावे,कीर्तनकारांना पेन्शन मिळण्याची व्यवस्था सुलभ व्हावी, त्या पेन्शनमध्ये वाढ व्हावी, तसेच सांगली, मिरज, कोल्हापूर येथून पंढरपूरच्या वारी काळात जादा रेल्वे सोडाव्यात या मागण्यांबाबत मी निश्चितपणे सकारात्मक प्रयत्न करीन, असे ना. कराड म्हणाले. ते म्हणाले, वारकरी भवन संदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी आवश्य बोलीन. पंढरीच्या वारी काळात जादा रेल्वेसाठी मी रेल्वे मंत्र्यांबरोबर बोलून निश्चित व्यवस्था करीन.
स्वागत आणि सत्कार लक्ष्मण नवलाई यांनी केला.ते म्हणाले ,अयोध्येत राम मंदिर झाले आहे,परंतु अजून आपल्याला काशी आणि मथुरा मुक्त करायचे आहे. त्यासाठी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत आणि त्यासाठी संजयकाका पाटील पुन्हा एकदा खासदार झाले पाहिजेत.
माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, या १४० कोटींच्या देशाची सूत्रे नेभळट,तत्वशून्यआणि ज्याला काही समजत नाही अशा व्यक्तींच्या हातात द्यायची की नरेंद्र मोदी यांच्यासारख्या समर्थ ,देशभक्त, रामभक्त नेत्याच्या हातात द्यायची याचा गांभीर्याने विचार करा. देव, देश आणि धर्मरक्षणासाठी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यासाठी संजयकाका पाटील हेच पुन्हा खासदार झाले पाहिजेत याची खूणगाठ मनाशी बाळगा.
मनोहर सारडा म्हणाले, देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने एक व्रत म्हणून भारतीय जनता पक्षाला मदत केली पाहिजे. मी स्वतः रोज माझे जेवढे ओळखीचे किंवा संबंधित लोक आहेत त्यांना संजयकाका पाटील यांना मतदान करा असे सांगतो. तुम्हीही प्रत्येकाने उरलेले तीन ,चार दिवस याच पद्धतीने प्रचार करावा. मी खात्रीपूर्वक सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या निवडून येणाऱ्या जागांचा आकडा ४०७ च्या पलीकडे गेलेला असेल.
सुरुवातीस श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर परमपूज्य नाना महाराज केळकर, अध्यात्मिक आघाडी विभागाचे सांगली लोकसभा क्षेत्राचे प्रमुख अजयकुमार वाले, महादेव विसापुरे महाराज,दिलीप सूर्यवंशी महाराज, ज्ञानेश्वर सांगोलकर महाराज, कृष्णा खटावकर महाराज, लक्ष्मणतात्या हारुगडे,एकनाथ दाजी कदम,मल्लिकार्जुन घेवारी आणि फार मोठ्या संख्येने वारकरी, टाळकरी, कीर्तनकार उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.