प्रतिष्ठा न्यूज

संजयकाकांच्या मताधिक्यासाठी युवक कार्यकर्त्यांचा बस स्थानक बगीच्यांमध्ये प्रचार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ युवक कार्यकर्त्यांनी बस स्थानक, विविध बगीचे आणि छोट्या व्यवसायिकांशी संवाद साधत संजयकाकांना मत द्या! असे आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीचा प्रचारात अंतिम टप्प्यात आला असून संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी युवक कार्यकर्त्यांनी वेग घेतला आहे. सांगली शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येथे प्रवाशांना भेटून पत्रके देत संजयकाका पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले. स्थानिक मार्गावरून जाणाऱ्या बसमधील प्रवाशांनाही या कार्यकर्त्यांनी मतदानाचे आवाहन करत संजय काकांनी केलेले विकासाचे कामे समजावून सांगितली.
सांगली शहराच्या विविध भागात असणारे फेरीवाले छोटे दुकानदार व्यापारी यांच्याशीही या युवकांनी संवाद साधला. आणि दहा वर्षात संजयकाकांनी केलेली विकासाची कामे शहरासाठी आणलेला निधी याची माहिती दिली.
दुपारच्या वेळी शहराचा मध्यवर्ती भागामध्ये असणारी विरंगुळ्याची ठिकाणे आमराई, त्रिकोणी बाग, महावीर उद्यान या परिसरात विश्रांतीसाठी आलेल्या नागरिकांशी या कार्यकर्त्यांनी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि संजयकाका पाटील यांनी सांगली जिल्ह्यात आणलेली विकासाची गंगा याबाबत नागरिकच या युवकांना माहिती देत होते. आणि यावेळी संजयकाकांना नक्की मताधिक्य देणार असे सांगत होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.