प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्याचा विकास करणाऱ्या संजयकाकांना मोठ्या फरकाने निवडून द्या : ज्योतीताई पाटील; विटा परिसरात प्रचार

प्रतिष्ठा न्यूज
विटा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा विकास करणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने निवडून द्या, असे आवाहन सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी केले. भाजपा प्रणित महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज खानापूर- आटपाडी मतदारसंघात विटा, बामणी, मंगळूर, पारे, कुर्ली, चिंचणी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची भेटी घेतल्या. येत्या सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अब की बार ४०० पार हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्वांनी मताधिक्त्याने संजयकाका पाटील यांना निवडून आणायचे आहे. सांगली जिल्ह्याचा विकास भाजपाच्या माध्यमातून संजय काका पाटील यांनी केला आहे. हा विकासाचा रथ असाच पुढे नेण्यासाठी संजयकाकांना मोठ्या फरकाने निवडून द्या असे आवाहन ज्योतीताई पाटील यांनी केले. यावेळी विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, जयश्रीताई पाटील, प्रणिती पाटील भाजप महिला मोर्चाच्या शुभांगी सुर्वे, विटा शहराध्यक्ष लता मेटकरी , सरिता चव्हाण, संगीता जाधव, सविता हूजरे व विटा शहर परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.