प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत संजयकाकांची प्रचाराची घोडदौड सुरू ; सर्व राजकीय अडथळे दूर; प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उत्साह

प्रतिष्ठा न्यूज
सांगली,दि.२९: सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराची घोडदौड सुरू आहे. सर्व सहा विधानसभा मतदारसंघात आता प्रचाराने पूर्ण गती घेतली असून भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात सहभागी झाले आहेत.
संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय, आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज्य पक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील रयत क्रांती संघटना, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील रासप, राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे अशा विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात सहभागी आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पदाधिकारी, प्रमुख नेते सर्व मतभेद बाजूला ठेवून संजयकाकांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.
सांगली विधानसभा मतदारसंघात आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, ज्येष्ठ नेते दीपकबाबा शिंदे ,लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक शेखर इनामदार, माजी आमदार नितीनराजे शिंदे, सौ. स्वातीताई शिंदे, पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष नीताताई केळकर, नेते प्रकाश बिर्जे, माजी नगरसेविका भारतीताई दिगडे,महिला मोर्चा अध्यक्ष सौ. गीतांजली ढोपे पाटील,सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाशमामा ढंग, नरेंद्र येरगट्टीकर, केदार खाडीलकर आदी मंडळी प्रचाराची आघाडी सांभाळत आहेत.
मराठा महासंघ,पतंजली योग समिती, सांगली जिल्हा वकील संघटना, विविध व्यापारी संघटना, भाजीपाला विक्रेते संघटना यांनी संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या आहेत. महापालिका क्षेत्रात आणि मतदारसंघातील ११ गावात नमो संवाद सभा सुरू आहेत.
मिरज विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची मोहीम सुरू आहे. पक्षाचे नेते मकरंद देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इदरीस नायकवडी, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाशमामा ढंग प्रचाराची मोहीम सांभाळत आहेत.
पलूस- कडेगाव मतदार संघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर उत्साहाचे वातावरण आहे. प्रचाराला चांगलीच गती आली आहे.सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी प्रचार मोहिमेची सगळी सूत्रे हाती घेतली आहेत. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते झटून प्रचार करीत आहेत. त्यांना संग्रामसिंह देशमुख, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गरुड मार्गदर्शन करीत आहेत.
खानापूर -आटपाडी विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहासभैया बाबर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तानाजीराव पाटील यांनी शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन संजयकाका पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक करण्याचे आवाहन केले. माजी आमदार (कै.) अनिलभाऊ बाबर आणि संजयकाका पाटील या दोघांनीही खानापूर -आटपाडी मतदारसंघातील पाणी प्रश्न तडीस लावण्यासाठी हातात हात घालून काम केले होते. त्यामुळे अनिलभाऊंनी संजयकाका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे आवाहन केले होते. अनिलभाऊंचा तो शब्द पाळणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कुठेही आतबाहेर न करता संजयकाका पाटील यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहायचे आहे, असे आवाहन सुहासभैया बाबर आणि तानाजीराव पाटील यांनी केल्यामुळे त्या मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, हर्षवर्धन देशमुख आदी मंडळीही संजयकाका पाटील यांना मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याच्या निर्धाराने कामाला लागले आहेत.
तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदार संघात तर हजारो कार्यकर्ते संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी झटत आहेत. तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे प्रमुख प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची मोहीम सुरू आहे.
जत विधानसभा मतदार संघामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमन्नगोंडा रवी, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार सुरू आहे. काँग्रेसचे नेते आमदार विक्रम सावंत यांचे निकटवर्तीय नेते सरदार पाटील यांनी नुकताच संजयकाका पाटील यांच्या प्रचार मोहिमेत प्रवेश केला असून त्यांनी तालुक्यात संजयकाका पाटील यांचे काम सुरू केले आहे.
स्वतः संजयकाका पाटील, सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील, वैष्णवीताई पाटील, प्रभाकर पाटील हे प्रचार मोहिमेत आघाडीवर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सर्व संस्था आणि संघटनांचे कार्यकर्तेही प्रचाराला गती देत आहेत. त्यामुळे सर्वत्र संजयकाका पाटील यांच्या प्रचाराचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्यासाठी संजयकाका पाटील यांनी केलेले काम, रेल्वे मार्गाचे रुंदीकरण, विद्युतीकरण तसेच सांगली- मिरज रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवण्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती प्रचार मोहिमेत दिली जात आहे. त्याच वेळी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी संजयकाका पाटील यांनाच विजयी करा असे आवाहनही करण्यात येत आहे. संजयकाका पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक करायची अशा निर्धाराने सर्व कार्यकर्ते प्रचाराच्या कामात मग्न झाले आहेत. शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता गती घेत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.