संजयकाका पाटील यांच्या प्रचाराला मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री येणार गुरुवारी सांगलीत भव्य सभा ; उमेदवारी अर्ज दाखल करणार
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महायुतीतील प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत गुरुवार दि. १८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सांगलीत स्टेशन चौकात जाहीर सभा आयोजित केली आहे. सकाळी लोकसभेसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. उन्हामुळे रॅली रद्द केली असून कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी थेट यावे, असे आवाहन संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खासदार संजयकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज सकाळी १२.३० वाजता दाखल करणार आहेत. दुपारी २ वाजता स्टेशन चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते येणार आहेत.