प्रतिष्ठा न्यूज

लोकतंत्र सेनानी संघाच्या वतीने सांगली येथे विजयदिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लोकतंत्र सेनानी संघ सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली येथे विजयदिन साजरा करण्यात आला. 21 मार्च 1977 रोजी देशातील आणीबाणी उठून मिसाबंधी व सत्याग्रही तुरुंगातून सुटले तो दिवस दरवर्षी विजयदिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री.प्रकाश तात्या बिरजे व ज्येष्ठ लोकतंत्र सेनानी श्री अरविंद मराठे यांचे हस्थे लोकनायक जयप्रकाश नारायण,भारतरत्न नानाजी देशमुख व भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच डॉ सुभाष मालानी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांचे पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले श्री अरविंद मराठे, व प्रकाश तात्या बिर्जे यांनी आणीबाणीत झालेल्या आठवणी सांगितल्या व विजयदिनाचे महत्व आपल्या भाषणात व्यक्त केले.अरविंद मराठे यांनी भारत प्रदूषण रोखण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले प्रदेश सचिव श्री प्रदीप ओगले यांचा सदर प्रसंगी उत्कृष्ट प्रदेश सचिव म्हणून सत्कार करण्यात आला.श्री प्रदीप ओगले यांनी मंत्रालय व जिल्हास्तरावर चाललेल्या कामकाजाची माहिती देऊन सेनानिंच्या शंका व कुशंका दूर केल्या श्री अशोक तुळपुळे यांनी एड.श्री मकरंद कुलकर्णी संपादित आणीबाणी बाबत पुस्तक प्रकाशना बाबत माहिती विषद केली.जिल्हा अध्यक्ष श्री राजा पडसलगीकर यांनी उपस्थित सेनानी चे स्वागत करून प्रास्ताविक केले श्री विनायक नवरे यांनी वार्षिक आर्थिक आढावा विषद केला श्री सुभाषराव कुलकर्णी यांनी आभार मानले सूत्र संचालन श्री विलास आपटे यांनी केले कार्यक्रमास सांगली जिल्हा व पुणे सातारा सोलापूर येथून बहुसंख्य लोकतंत्र सेनानी उपस्थित होते श्री प्रकाश मुळगुंद जिल्हा सचिव अनंत गोरे मधुसूदन देवल यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.